पुणे : ‘राईज अप’ महिला क्रीडा स्पर्धा : ..इथे करा जलतरण स्पर्धेची नावनोंदणी | पुढारी

पुणे : ‘राईज अप’ महिला क्रीडा स्पर्धा : ..इथे करा जलतरण स्पर्धेची नावनोंदणी

पुढारी वृत्तसेवा :  दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिला जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शनिवार दि. 10 डिसेंबर आणि रविवार दि. 11 डिसेंबर या कालावधीत टिळक तलाव येथे होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना मोफत नाव नोंदणी करता येणार आहे.

या स्पर्धेतील प्रवेशासाठी लागणारे प्रवेश अर्ज टिळक तलाव, कर्वे रोड, डेक्कन जिमखानाच्या कार्यालयामध्ये  सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत उपलब्ध असणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवार दि. 2 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. या स्पर्धा पुणे डिस्ट्रिक्ट अ‍ॅमेच्युयर अ‍ॅक्वेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि सहकार्याने होणार आहेत. या स्पर्धेच्या नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी सायली ठोसर यांच्याशी 9657716636 या क्रमांकावर संपर्क  साधावा.

Back to top button