पुणे : ‘राईज अप’ महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये संजना, चैनानी, सोमती कोडग अव्वल | पुढारी

पुणे : ‘राईज अप’ महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये संजना, चैनानी, सोमती कोडग अव्वल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये 13 वर्षांखालील गटाच्या 200 मीटर प्रकारात रेसिंग फिटनेसच्या सोमती कोडग हिने, तर गोळाफेक प्रकारामध्ये सेंट मेरीज स्कूलच्या संजना चैनानी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
दै. ‘पुढारी’ आयोजित या स्पर्धेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आज समारोप झाला. स्पर्धेसाठी पुणे शहर, पुणे जिल्हा,
पिंपरी-चिंचवड येथून मोठा प्रतिसाद मिळाला.

पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने आणि सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये 13 वर्षांखालील गटाच्या 200 मीटर प्रकारामध्ये रेसिंग फिटनेसच्या सोमती कोडग हिने 27.74 सेकंदांची वेळ नोंदवीत प्रथम क्रमांक, सेंट फ—ान्सिसच्या शर्वरी सोनवणे हिने 28.40 सेकंदांची वेळ नोंदवीत व्दितीय क्रमांक, तर महाराष्ट्रीय मंडळाच्या सिया गुगळे हिचा 28.85 सेकंदांची वेळ नोंदवीत तृतीय क्रमांक पटकाविला.

13 वर्षांखालील गटाच्या गोळाफेक प्रकारात सेंट मेरीज स्कूलच्या संजना चैनानी हिने 9.34 मीटर लांब फेकत प्रथम क्रमांक, पल्लक खंडीझोड हिने व्दितीय, तर एसपीएमपीएसच्या सुश्रीया शिंभे हिने 7.00 मीटर लांब फेकत तृतीय क्रमांक पटकाविला. 13 वर्षांखालील गटाच्या उंच उडी प्रकारात हॅचिंग्स संघाच्या ऋतुजा ताकवले हिने 1.30 मीटर लांब उडी मारीत प्रथम क्रमांक, हॅचिंग्सच्या गार्गी तळेकर हिने 1.15 मीटर लांब फेकत व्दितीय, तर हॅचिंग्सच्या तनुश्री शेट्टीगर हिने 1.15 मीटर लांब फेकत तृतीय क्रमांक पटकाविला. 17 वर्षांखालील गटाच्या लांब उडी प्रकारात रेसिंग फिटनेसच्या शेजल नाईक हिने 4.78 मीटर लांब उडी मारत प्रथम क्रमांक, डेक्कन जिमखानाच्या संज्ञोत अडकर हिने 4.70 मीटर लांब उडी मारत व्दितीय क्रमांक, तर गणेश स्पोर्ट्सच्या अद्विका गोखले हिने 4.58 मीटर लांब उडी मारत तृतीय क्रमांक पटकाविला.

15 वर्षांखालील गटाच्या थाळीफेक प्रकारात हॅचिंग्सच्या रिया बक्रे हिने 19.76 मीटर लांब फेकत प्रथम क्रमांक, हॅचिंग्सच्या दिया बसंतानी हिने 17.38 मीटर लांब फेकत व्दितीय क्रमांक, तर लक्ष्य स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या चैत्राजी साळुंके हिने 16.43 मीटर लांब फेकत तृतीय क्रमांक पटकाविला. 15 वर्षांखालील गटाच्या 200 मीटर या प्रकारामध्ये शरद शाळेच्या श्रावणी रोहाडे हिने प्रथम क्रमांक, विखे पाटील स्कूलच्या यशश्री सकपाळ हिने व्दितीय क्रमांक, तर सीएजीएसच्या कृष्णाली जगताप हिने तृतीय क्रमांक पटकाविला.क्रॉसकंट्री प्रकारामध्ये 13 वर्षांखालील गटाच्या 2 किलोमीटरमध्ये पुणे अ‍ॅथलेटिक्स क्लबच्या आर्या सुपेकर हिने 9.29.2 सेकंदांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक, आर. सी. स्पोर्ट्स अ‍ॅथलेटिक्स क्लबच्या प्रांजल थोरातने 10.29.9 सेकंदांची वेळ नोंदवत व्दितीय क्रमांक, तर महाराष्ट्रीय मंडळाच्या दिशाली नहार हिने 11.01.02 सेकंदांची वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकाविला. 15 वर्षांखालील गटाच्या 2 किलोमीटर क्रॉसकंट्रीमध्ये महाराष्ट्रीय मंडळाच्या दक्षा नहार हिने 9.57.1 सेकंदांत प्रथम क्रमांक, ई-नाइट क्लबच्या श्रध्दा निकम हिने 10.16.9 सेकंदांची वेळ नोंदवत व्दितीय क्रमांक, तर एसडीके हायस्कूलच्या अंजली ठाकूर हिने 11.43.9 सेकंदांची वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकाविला.

महिला गटाच्या 6 किलोमीटर क्रॉसकंट्री या प्रकारात बनेश्वर क्रीडा प्रबोधिनीच्या ऋतुजा वाल्हेकर हिने 20.26.5 सेकंदांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक, बनेश्वर क्रीडा प्रबोधिनीच्या अनुजा वाल्हेकर हिने 21.29.1 सेकंदांची वेळ नोंदवत व्दितीय क्रमांक, तर बनेश्वर क्रीडा प्रबोधिनीच्या गौरी यादव हिने 21.32.8 सेकंदांची वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेसाठी सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे क्रीडा विभागप्रमुख दीपक माने, सहायक दत्ता महादम आणि सर्व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

त्याचबरोबर पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे तांत्रिक समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील, हर्षल निकम, चंद्रशेखर कुदळे, समितीचे पंच रामदास कुदळे, शशिकांत लांडगे, मंगेश पवार, जगदीश सोनवणे, विष्णू कुदळे, रवींद्र बोराडे, प्रमिला गायकवाड, अन्वर शेख, विजयसिंह गायकवाड, रतन गणगुडे, नितीन दुबे, गणेश गोंडे, वैभव पायगुडे, निखिल मोरे, अभिजित गायकवाड, मंगेश पवार, सिराज सेनगुप्ता, रमेश चव्हाण, विठ्ठल मिटकरी, आकांक्षा देशमुख, बिजू थॉमस, चंद्रिका गायकवाड, शुभम बाबर यांनी स्पर्धेमध्ये पंच म्हणून भूमिका पार पाडली. मुख्य प्रायोजक ऑक्सिरीच, हेल्थ पार्टनर डॉ. ऑर्थो, अ‍ॅकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूट, फायनान्शिअल पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, मीडिया पार्टनर झी टॉकीज आणि डॉ. सागर बालवडकर या सर्व प्रायोजकांच्या सहकार्याने या स्पर्धा पार पडल्या.

दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या केवळ महिलांच्या क्रीडा स्पर्धांमधून आगामी काळात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महिला क्रीडापटू पुण्याचे नाव उंचावतील, असा विश्वास असून, दै. ‘पुढारी’ने आम्हाला अ‍ॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी सहभागी करून घेतले. यापुढेही ‘पुढारी’च्या उल्लेखनीय उपक्रमात एसकेपी संस्था सोबत असेल.
                                                                   – डॉ. सागर बालवडकर

Back to top button