पुणे : ‘राईज अप’ महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : कृष्णाली, दिव्या अव्वल | पुढारी

पुणे : ‘राईज अप’ महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : कृष्णाली, दिव्या अव्वल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये 800 मीटर धावण्याच्या प्रकारामध्ये पंधरा वर्षांखालील गटात कृष्णाली जगताप, तर 13 वर्षांखालील गटात दिव्या घोडेकर यांनी अव्वल क्रमांक पटकाविला. दै. ‘पुढारी’ आयोजित या स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सुरू आहेत. या स्पर्धेमध्ये 800 मीटर धावणे प्रकारात पंधरा वर्षांखालील गटात सीएजीएसच्या कृष्णाली जगतापने प्रथम, पुणे अ‍ॅथलेटिक्सच्या अयुशा वायकरने व्दितीय, तर जय हिंदच्या ऐश्वर्या हिंगेने तृतीय क्रमांक पटकाविला. 13 वर्षांखालील गटामध्ये रेसिंग फिटनेसच्या दिव्या घोडेकरने प्रथम, तर सोमती कोडग हिने व्दितीय क्रमांक पटकाविला. पुणे औंध क्लबच्या आर्या सुपेकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

17 वर्षांखालील गटामध्ये रेसिंग फिटनेसच्या प्रांजल बच्चे हिने प्रथम, तर वेदश्री लोणारीने व्दितीय क्रमांक पटकाविला. पीसीएससीच्या अभिज्ञा हारोळेने तृतीय क्रमांक पटकाविला. महिलांच्या खुल्या गटामध्ये रसिंग फिटनेस क्लबच्या सपना चौधरीने प्रथम क्रमांक, वननेस स्पोर्ट्स क्लबच्या संतोष नारळकरने व्दितीय, तर शरयू माळीने तृतीय क्रमांक पटकाविला. 4 बाय 100 रिलेमध्ये रेसिंग फिटनेस क्लबने प्रथम क्रमांक पटकाविला.

या रिलेमध्ये लोपमुद्रा सिंग, विराजबाला भोसले, सोमती कोडाग आणि दिव्या घोडेकर यांचा समावेश होता. दुसरा क्रमांक मिळविलेल्या वननेस स्पोर्ट्स क्लबच्या रिलेमध्ये ज्ञानेश्वर जाधव, मृणाल डावरे, मनस्वी कानसकर आणि वैष्णवी बुरंगे यांचा समावेश होता. तिसरा क्रमांक पटकाविणार्‍या महाराष्ट्र मंडळाच्या रिलेमध्ये दिशाली नहार, त्रिशा रणदिवे, अनुष्का शुक्ला आणि सिया गुगळे या खेळाडूंचा समावेश होता. गोळा फेक प्रकाराच्या महिला गटामध्ये रेसिंग फिटनेसच्या सावरी शिंदेने प्रथम, जय हिंद क्लबच्या सुमिथा येसुदासने व्दितीय, तर महाराष्ट्रीय मंडळाच्या अनिता चांदणेने तृतीय क्रमांक पटकाविला.

थाळी फेक प्रकाराच्या 17 वर्षांखालील गटामध्ये महाराष्ट्र मंडळाच्या किरण नायर हिने प्रथम क्रमांक, पीसीएमसीच्या सिध्दी भोसलेने व्दितीय क्रमांक तर रेसिंग फिटनेसच्या शेजल नाईक हिने तृतीय क्रमांक पटकाविला. मुख्य प्रायोजक ऑक्सिरीच, हेल्थ
पार्टनर डॉ. ऑर्थो, अकॅडमीक पार्टनर सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूट, फायनानशियल पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, मीडिया पार्टनर  झी टॉकीज आणि डॉ. सागर बालवडकर या सर्व प्रायोजकांच्या सहकार्याने स्पर्धा सुरू आहेत.

Back to top button