खंडाळा घाटात भरधाव ट्रकची सहा कारना धडक | पुढारी

खंडाळा घाटात भरधाव ट्रकची सहा कारना धडक

लोणावळा : उतारावर भरधाव वेगात जाणार्‍या एका ट्रकच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे जाणार्‍या सहा वाहनांना धडकला. या विचित्र अपघातात सहा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या ट्रकच्या (एमएच-12 एटी 7932) चालकाचे खंडाळा घाटातील किलोमीटर क्रमांक 38 येथील तीव— उतार व वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे जाणार्‍या सहा कारला जोरात धडकला.

यामध्ये कारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या विचित्र अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक अनिल शिंदे, खोपोली पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबीचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत मार्गावरील अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली

Back to top button