महिलेचा अश्लिल व्हिडीओ कॉल रेकाँर्ड करून व्हायरल करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

महिलेचा अश्लिल व्हिडीओ कॉल रेकाँर्ड करून व्हायरल करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : महिलेचा अश्लिल व्हिडीओ कॉल रेकाँर्ड करून तो व्हायरल केल्याप्रकरणी एकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलसिंग राजपुत (वय २७ रा. कुरकुंभ, मुळ गाव आग्रा, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल असलेल्याचे नाव आहे. याबाबत २८ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि.२५) कुरकुंभ (ता. दौंड) येथे हा प्रकार घडला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलसिंग राजपुत याने एका पिडित महिलेेच्या सहमतीशिवाय तिचा अश्लिल व्हिडीओ काॅल रेकाँर्ड केला. त्यानंतर माझ्यासोबत राहावयास ये म्हणून धमकी दिली. यास नकार दिल्याने पिडित महिलेचा मानलेला भाऊ विशाल गायकवाड याच्या फेसबुकवर तो व्हिडीओ पाठवला. तसेच पिडितेच्या व्हाट्सॲपवर पाठवला. याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत.

Back to top button