इंदापूर : देशी गाईंच्या संवर्धनाचे रचना खिलार फार्मचे काम अभिनंदनीय : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

इंदापूर : देशी गाईंच्या संवर्धनाचे रचना खिलार फार्मचे काम अभिनंदनीय : खा. सुप्रिया सुळे

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : आपल्या पशुसंपदेतील महत्त्वाचा घटक म्हणजे देशी गाई असून, त्यांचे संवर्धन करण्याचे काम रचना खिलार फार्म करीत आहे. ते अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील माजीद खान पठाण यांच्या रचना खिलार फार्मला गुरुवारी (दि. 24) खासदार सुळे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पठाण यांच्याकडून भारतीय गोवंशाची माहिती घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, रचना फार्म हे देशी गाईंचे संवर्धन करत आहेत.

त्यांच्याकडे तीन महाराष्ट्र चॅम्पियन गाई आहेत, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. देशी संवर्धनाचे जतन करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी रचना फार्मचे व जेके ट्रस्टचे माजिद खान पठाण यांनी देशात 38 जातींच्या देशी गाई आहेत.
त्यातील आठ जाती आपल्याकडे असल्याचे सांगत त्यामध्ये प्रादेशिक जात असलेल्या खिलारचे संवर्धन रचना फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात होते.

कृषी विज्ञान केंद्र बारामती व जेके ट्रस्टच्या माध्यमातून जगातील पहिला टेस्ट ट्यूब बेबी 2017 मध्ये आपण केल्याचे सांगत देशी गोवंशाची व या गाईंपासून उत्पादित करणार्‍या सर्व उत्पादनाची संपूर्ण माहिती यावेळी दिली. यावेळी माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रताप पाटील, सचिन सपकाळ, हनुमंत कोकाटे, विजय शिंदे, जुबेर पठाण, शुभम निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button