पुणे : चिमुकल्यांच्या वावराने बालभवनांमध्ये किलबिलाट

पुणे : चिमुकल्यांच्या वावराने बालभवनांमध्ये किलबिलाट
Published on
Updated on

सुवर्णा चव्हाण

पुणे : मुलांना आवडत्या खेळांचा, संगीत, नृत्याचा मनसोक्त आनंद बालभवनाद्वारे मिळतो. कोरोनाच्या छायेतून बाहेर पडून ही बालभवने विविध उपक्रम राबवत मोठ्या जोमाने सुरू झाली असून, येथे येणारी मुले विविध कला-क्रीडांमध्ये रममाण होत आहेत. फ्लॅटसंस्कृतीत मैदानी खेळ अन् विविध उपक्रमांत सहभागी होण्याचे लहान मुलांचे हक्काचे ठिकाण म्हणजे बालभवन….पुणे शहरात अशी बालभवने असून, जिथे मुले खेळण्याचा अन् विविध उपक्रमांत सहभागी होण्याचा आनंद घेऊ शकतात.

कोरोना काळात बालभवने बंद होती. पण, बालभवन सुरू झाल्यानंतर मुले आता बालभवनमध्ये मनमुरादपणे मैदानी खेळ खेळताना दिसत आहेत. बालभवनात प्रशिक्षण कार्यशाळांपासून ते माहितीपर उपक्रमांपर्यंत, तसेच मैदानी खेळही घेतले जात आहेत. महेश बालभवनच्या संचालिका सुरेखा करवा म्हणाल्या, 'बालभवनाला 30 वर्षे झाली आहेत. कोरोना काळात बालभवन बंद होते.

त्यामुळे मुलांचा हिरमोड झाला. पण, सध्याच्या घडीला दोन वर्षांपुढील सुमारे 1000 मुले बालभवनात आनंदाने येत असून, पालक मुलांना बालभवनमध्ये पाठवत आहेत. मुले मैदानी खेळांमध्ये कराटे, स्केटिंग, बास्केटबॉल, क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतात. मुले बालभवनात येतात, मित्र-मैत्रिणींबरोबर खेळण्याचा आनंद घेतात, हे पाहून आनंद वाटतो.'

कोरोनाकाळात दोन वर्षे बंद असलेले गरवारे बालभवन सुरू झाल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुले आनंदाने खेळू लागली आहेत आणि तो आनंद त्यांच्या चेहर्‍यावर पाहायला मिळत आहे. सायंकाळी साडेचार ते सहा आणि पावणेसात ते सव्वासात या वेळेत मुले बालभवनात येत आहेत. सायंकाळच्या वेळेत मुले बालभवनात येऊन वेगवेगळ्या मैदानी खेळांचा आनंद घेत आहेत. सध्या तीन ते बारा वयोगटातील 125 ते 150 मुले येत असून, व्यायाम, खेळ, गाणी, हस्तकला, चित्रकला, नृत्य आणि गोष्टी असे वेगवेगळे उपक्रम मुलांसाठी घेत आहोत. दिवाळी संपल्यानंतर येथे येणार्‍या मुलांची संख्या वाढली आहे.

                                                                         – सुवर्णा सखदेव,

उपसंचालिका, गरवारे बालभवनबालभवनात खेळायला आल्यानंतर खूप छान वाटते. आम्ही सर्व मुले खूप मजा-मस्ती करतो. मी विविध खेळांमध्ये सहभागी होतो. आम्ही मित्र एकत्रित येऊन खूप खेळतो. आम्हाला प्रशिक्षकही खूप सहकार्य करतात. खूप एन्जॉय करतो.

                                                      – अथर्व, बालभवनात येणारा लहान मुलगा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news