पुणे : बावधन पाणी योजनेसाठी 22 कोटी 70 लाख मंजूर

पुणे : बावधन पाणी योजनेसाठी 22 कोटी 70 लाख मंजूर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या बावधन बुद्रुक या गावामध्ये समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यास स्थायी समितीने 22 कोटी 70 लाख 80 हजारांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. बावधन बु. येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने या गावात समान पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअतंर्गत 100 मि.मी. ते 500 मि.मी. व्यासापर्यंत डी.आय. पाइप टाकून 31.81 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

त्यात एअर व्हॉल्व्ह, स्लुईस व्हॉल्व्ह, फायर हायड्रेट, अक्चुएटर आदी साहित्याचा समावेश आहे. नव्याने जलवाहिन्या टाकण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्यानंतर प्रशासनाला तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये सर्वात कमी दराची निविदा आर. जी. सानप कन्स्ट्रक्शन यांची होती. त्यामुळे या ठेकेदाराकडून जलवाहिनीचे काम करून घेण्याचा व त्यास 22 कोटी 70 लाख 80 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्याला समितीने मान्यता दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news