

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' आयोजित 'राईज अप' महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये 13 वर्षांखालील गटामध्ये पद्मश्री पिलाई, ख्याती कत्रे, मधुरा काकडे, शौर्या शेलार उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. दै. 'पुढारी' आयोजित या स्पर्धा पी. ई. सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्टस कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथे सुरू आहे. 13 वर्षांखालील गटामध्ये झालेल्या लढतीमध्ये मधुरा काकडे हिने अभिज्ञा ठोंबरे हिचा 15-13, 15-8 असा, शौर्या शेलार हिने रिद्धिमा जोशी हिचा 15-8, 15-3 असा, पद्मश्री पिलाई हिने अनया कामत याचा 15-9, 15-11 असा तर ख्याती कत्रे हिने श्रावणी अद्रेय हिचा 15-9, 15-10 असा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
15 वर्षांखालील गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत सिया बेहेदे हिने शौर्या शेलार हिचा 15-9, 5-15, 15-13 असा 2-1 च्या फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसर्या उपांत्य लढतीमध्ये भक्ती पाटील हिने साफा शेख हिचा 15-13, 15-9 असा दणदणीत पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. 17 वर्षांखालील गटाच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये अनया देशपांडे हिने स्वामी तिकोणे हिचा 15-11, 15-4 असा, अपूर्वा घावटे आणि पियुषा फडके यांच्यातील सामना झाला नाही. अर्पिता अद्रेय हिने मिताली इंगळे हिचा 15-4, 15-7 असा, मृणाल सोनार हिने सन्मती रुगे हिचा 15-7, 15-7 असा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
19 वर्षांखालील गटामध्ये इशावरी राणे हिने नेहा गाडगीळ हिचा 7-15, 15-13, 15-5 असा 2-1 च्या फरकाने पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मृणाल सोनार हिने रिध्दी पुडके हिचा 15-5, 15-4 असा, अनया देशपांडे हिने मिताली इंगळे हिचा 15-6, 15-2 असा तर अर्पिता अद्रेय हिने स्वामिनी तिकोणे हिचा 15-7, 15-5 असा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महिला गटाच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये मृणाल सोनार हिने अक्षता कत्रे हिचा 15-4, 15-6 असा, अनया देशपांडे हिने सिया बेहेदे हिचा 15-8, 15-1 असा तर अर्पिता अद्रेय हिने अमृता देशमुख हिचा 17-15, 15-6 असा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुहासिनी यादव आणि रिध्दी पुडके यांच्यात सामना झाला नाही. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ऑक्सिरीच, हेल्थ पार्टनर डॉ. ऑर्थो, अकेडमीक पार्टनर सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूट, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, मीडिया पार्टनर झी टॉकीज आणि डॉ सागर बालवडकर या सर्व प्रायोजकांच्या सहकार्याने या स्पर्धा सुरू आहेत.