पुणे : व्हॉट्सअ‍ॅपवरील ओळखीच्या आधारे भेटणे पडले महागात | पुढारी

पुणे : व्हॉट्सअ‍ॅपवरील ओळखीच्या आधारे भेटणे पडले महागात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीबरोबर ऑलनाईन झालेल्या ओळखीतून तिला न सांगता लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने अत्याचारापूर्वी आईला बाथरूममध्ये जाऊन लोकेशन टाकल्यानंतर तिच्या घरच्यांनी घटनास्थळी पोहचून मुलीची सुटका केली. याप्रकरणी माजी सरपंच असलेल्या संतोष नाझिरकर (रा. नाझिरे, ता. पुरंदर) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिरकरची पीडित मुलीशी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. काही दिवसांतच त्यांच्या दोघांत मैत्री झाली. बुधवारी (दि.23) बाहेर जेवायला जाऊ, असे सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज येथे असलेल्या एका लॉजवर नेले. त्या ठिकाणी तिला त्याच्यावर संशय आल्याने पीडित मुलीने बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लगेच लोकेशनही पाठविले.

त्यानंतर बाथरूमधून बाहेर आलेल्या अल्पवयीन मुलीवर नाझिरकर याने बलात्कार केला. दरम्यान, पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. या वेळी संतोष नाझिरकर याला पोलिसांनी पकडले. याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Back to top button