पुणे मेट्रो धावली सिव्हिल कोर्टपर्यंत | पुढारी

पुणे मेट्रो धावली सिव्हिल कोर्टपर्यंत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रशासनाने शुक्रवारी गरवारे मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो ट्रेनची यशस्वीरीत्या चाचणी घेतली. त्यामुळे मेट्रोचा आता आणखी पुढील टप्प्यात धावण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे दिसून आले आहे.
मेट्रोने गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी चाचणीस सुरुवात केली. डेक्कन स्थानक, छत्रपती संभाजी उद्यान स्थानक, पुणे महानगरपालिका स्थानक पार करून 3 वाजून 10 मिनिटांनी ही ट्रेन सिव्हिल कोर्ट येथील उन्नत स्थानकामध्ये पोहोचली. या पूर्ण मार्गाची लांबी 2.74 किमी आहे.

सिव्हिल कोर्ट स्थानकात आल्यावर मेट्रो कर्मचार्‍यांनी ट्रेनचे जल्लोषात स्वागत केले. या चाचणीसाठी ट्रॅक विभाग, व्हायाडक्ट विभाग, मेट्रो स्थानक विभाग, ट्रॅकशन विभाग, सिग्नल विभाग, टेलिकॉम विभाग, रोलिंग स्टॉक विभाग अहोरात्र काम करीत होते. येत्या काही दिवसांत आणखी चाचण्या घेण्यात येणार असून, सर्व यंत्रणांची तपासणी करण्यात येईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

Back to top button