गुवाहाटीला जाऊन आता कोणाचा बळी देणार हे पाहू ; अजित पवार यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला | पुढारी

गुवाहाटीला जाऊन आता कोणाचा बळी देणार हे पाहू ; अजित पवार यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपाल कोश्यारी यांचा वक्तव्याचा निषेध म्हणून उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली तर  आम्ही त्याला  सकारात्मक पद्धतीनेच प्रतिसाद देणार असल्याच विधान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केलं. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्याबाबत मात्र त्यांनी स्वत:च्या खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणतात, ‘मला कळलं की आमदार राहत असलेल्या तिथल्या हॉटेलचे बिल दिलं नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने आत्महत्या केली अशी माध्यमांमध्ये चर्चा होती. ते जिथे दर्शनाला चालले आहेत. तिथे रेडा बळी देण्याची पद्धत आहे. हे हे तिथे जाऊन आता कोणाचा बळी देणार हे पाहू. अशा ठिकाणी अनेकदा लोक नवस फेडायला जात असतात. दर्शनाला जात असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत.’

त्यांना सीमा प्रश्नांबाबत छेडलं असता ते म्हणाले, ‘ राज्य सरकार ने जत पंढरपूरकडे लक्ष देऊन लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजे. तिथल्या लोकांना आपलेपणाची वागणूक मिळेल असे सरकारने प्रयत्न केले पाहिजे. यात विरोधी आणि सत्ताधारी अशा दोन्ही पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. कर्नाटक मुख्यमंत्री यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक भाषेत उत्तर दिले पाहिजे. तिकडच्या सरकारने महाराष्ट्राची एक इंच पण जागा त्यांच्याकडे येईल असा विचार मनामध्ये आणू नये. बेळगाव, निपाणी या सीमाभागातील गावांचे विषय सध्या कोर्टात आहेत. ही गावं महाराष्ट्राचा भाग व्हावी यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मी हा असं बोलतो तो असं बोलतो याबद्दल बोलायचं मक्ता घेतला नाही

उदयनराजे यांनी अलीकडेच राज्यपाल यांनी ज्यावेळी विधान केले त्या व्यासपीठावर शरद पवार होते.त्यांनी तेव्हा काहीच भूमिका मांडली नाही हे विधान केलं होतं. पवारांना याबाबत छेडलं असता ‘ मी हा असं बोलतो तो असं बोलतो याबद्दल बोलायचं मक्ता घेतला नाही’ हे विधान त्यांनी केलं .

Back to top button