पुणे : मतदार नोंदणीसाठी आता वर्षातून चार वेळा संधी | पुढारी

पुणे : मतदार नोंदणीसाठी आता वर्षातून चार वेळा संधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता वयाची 18 वर्षे पूर्ण होणार्‍या व्यक्तींना 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर अशी वर्षातून चारवेळा मतदार नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. सद्य:स्थितीत भारत निवडणूक आयोगाचा छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे.

त्यानुसार 8 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये मतदार यादीत अजून नाव समाविष्ट नसलेल्या 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना नाव नोंदविण्यासाठी नमुना अर्ज भरता येणार आहे. पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन त्यांचे नाव मतदारयादीत नोंदविण्यासाठी र्पीीिं. ळप या संकेतस्थळावरून तसेच तेींशी कशश्रश्रिळपश अिि आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून नमुना अर्ज क्र. 6 भरावा किंवा आपल्या नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 26 व 27 नोव्हेंबर 2022 रोजी तृतीयपंथी समुदाय, देहव्यवसाय करणार्‍या स्त्रिया आणि भटक्या व विमुक्त जमातींच्या व्यक्तींसाठी नियोजित ठिकाणी व 3 व 4 डिसेंबर रोजी सर्व नागरिकांसाठी मतदान केंद्रावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या वेळी सर्व अर्हतापात्र नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपले नाव मतदारयादीत नोंदवावे.

                                                    डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Back to top button