पुणे : राज्यातील तापमान वाढले; थंडीचा कडका झाला कमी | पुढारी

पुणे : राज्यातील तापमान वाढले; थंडीचा कडका झाला कमी

पुणे : जळगाव शहर आणि परिसर वगळता राज्यातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे. दरम्यान, सलग पाचव्या दिवशी जळगाव शहरात कडाक्याची थंडी होती. शहरात किमान तापमानाचा पारा 9.5 अंशांवर गेला. मंगळवारपासून दक्षिणेकडून येणार्‍या बाष्पयुक्त वार्‍यांमुळे ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे उत्तरेकडून राज्याकडे येणार्‍या थंड वार्‍यांवर परिणाम झाला आणि राज्यातील किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर राज्यात थंडीचा कडाका कमी राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे गुरुवारचे
कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
शहर      कमाल           किमान
पुणे         31.5             14.9
जळगाव  31.3              9.5
कोल्हापूर 30.1              20
सांगली    30.6            18.5
नाशिक    31.3           10.2
रत्नागिरी    35              21.2
सातारा    31.7           17.3
सोलापूर  33.3             20
मुंबई      32.8              22
औरंगाबाद 30.5           12
नागपूर    30.2           12.4

Back to top button