दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ : अपूर्वा घावटे, भक्ती पाटील उपांत्यपूर्व फेरीत

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ : अपूर्वा घावटे, भक्ती पाटील उपांत्यपूर्व फेरीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' आयोजित 'राईज अप' महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सतरा वर्षांखालील गटात अपूर्वा घावटे हिने तर पंधरा वर्षांखालील गटात भक्ती पाटील हिने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दै. 'पुढारी' आयोजित या स्पर्धा पी. ई. सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्टस कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथे सुरू आहेत.

सतरा वर्षांखालील गटामध्ये अपूर्वा घावटे हिने सिया बेहेदेचा 15-10, 15-10 असा, अर्पिता आरध्ये हिने सफा शेख हिचा 15-7, 15-7 असा, मिताली इंगळे हिने प्रणिका ठाकरे हिचा 15-13, 8-15, 18-16 असा 2-1 च्या फरकाने तर सन्मती रुगे हिने सानवी देखणे हिचा 15-8, 15-10 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पंधरा वर्षांखालील गटामध्ये शौर्या शेलार हिने अनुषा सुजन हिचा 15-9, 16-14 असा पराभव करीत विजय मिळविला. पद्मश्री पिलाई हिने पूर्वा वालवडे हिचा 12-15, 15-9, 16-14 असा 2-1 च्या फरकाने, भक्ती पाटील हिने स्वामिनी तिकोणे हिचा 15-12, 15-10 असा, सन्मती रुगे हिने नुपूर ठक्कर हिचा 15-13, 16-14 असा, सफा शेख हिने प्रणाली डोईफोडे हिचा 12-15, 15-8, 15-7 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

एकोणीस वर्षांखालील गटामध्ये मिताली इंगळे हिने शर्वया शिवदे हिचा 15-8, 15-13 असा, स्वामिनी तिकोणे हिने प्राची शितोळे हिचा 15-4, 15-4 असा, रिध्दी पुडके हिने अपूर्वा घावटे हिचा 15-9, 16-14 असा, अनया देशपांडे हिने शांभवी के हिचा 15-1, 15-0 असा एकतर्फी पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news