पुणे : दहा मिनिटांत कर्जमंजुरीच्या बहाण्याने फसवणूक | पुढारी

पुणे : दहा मिनिटांत कर्जमंजुरीच्या बहाण्याने फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पेटीएम कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून ऑनलाइन 35 हजारांची रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग करून फसवणूक करणार्‍या ओडिशा राज्यातील एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. अशाच पध्दतीने त्याने इतर दुकानदारांची देखील फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. अजितकुमार अक्षयकुमार पसध्या (रा. चंदननगर, पुणे; मूळ रा. कटक, ओडिशा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

आरोपीने चंदननगर परिसरातील दुकानदाराला पेटीएम कंपनीचा प्रतिधिनी असल्याची बतावणी केली. त्यांना मोबाईलवरून 10 मिनिटांत लोन मंजूर केल्याचे सांगत 35 हजारांची कर्जस्वरूपात आलेली रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करून घेतली. आरोपी चंदननगरमध्ये फिरत असल्याचे लक्षात येताच सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, सुरज जाधव, अजय शेळके, मनोज भंडारी यांनी केली.

महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट
भीम आर्मीच्या इन्स्टाग्राम ग्रुपवर महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट प्रसिद्ध करणार्‍या गनस्टार लखन नावाच्या एकावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत छाया सुखदेव कांबळे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 21 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

पेटीएमद्वारे कर्ज मिळवून आरोपीने दुकानदारांना विश्वासात घेऊन त्यांना विविध ऑफर दिल्याचे व कागदपत्रांचा वापर करून ऑनलाइन कर्ज घेऊन अशाच पध्दतीने फसवणूक केल्याचे तपासात समोर येत आहे. त्याने अशाच पध्दतीने विमानतळ, येरवडा तसेच कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असेच प्रकार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कोणाची अशा पध्दतीने फसवणूक झाली असेल, तर त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
                                                         – राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Back to top button