पुणे : शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा खून | पुढारी

पुणे : शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा खून

पुणे : पूर्ववैमनस्य व दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून सराईताचा खून करण्यात आल्याची घटना मध्यरात्री नाना पेठेतील राजेवाडी परिसरात झाली. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एका महिलेसह इतर साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहन रवींद्र पवार (वय 24) असे खून झालेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी आदित्य केंजळे (वय 25), राजन ऊर्फ रोहित काउंटर (वय 23, तिघे राजेवाडी, नाना पेठ), सौरभ गायकवाड (वय 18) यांना अटक करण्यात आली आहे. रवींद्र ऊर्फ माऊली श्रावण पवार (वय 56, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन पवार याच्या विरोधात मारामारीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिली. रोहन पवार याला मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी राजन काउंटरने घरातून बोलावून नेले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रोहनवर आरोपींनी कोयत्याने वार केले. त्याच्या डोक्यात वीट मारली.

Back to top button