पुणे : मम्मीला कार दाखवून आणतो म्हणून गेला तो परतलाच नाही | पुढारी

पुणे : मम्मीला कार दाखवून आणतो म्हणून गेला तो परतलाच नाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ट्रेस्ट ड्राईव्हसाठी घेतलेली गाडी नेताना मम्मीला गाडी दाखवून आणतो, असे सांगून एक जण गेला, तो परत आलाच नाही. याप्रकरणी इशांत शर्मा नावाच्या व्यक्तीवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीद जैनुद्दीन शेख ( रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. नाना पेठेत फिर्यादी यांचा जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.

दि. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता संत कबीर चौकात शर्मा कार खरेदी करण्याच्या बहाण्याने आला. त्याने कार खरेदी करायची आहे, असे सांगून 2 लाख 90 हजारांचा धनादेश शेख यांना दिला. नंतर शेख यांना विनंती करून कार मम्मीला दाखवून आणतो, असे सांगितले. शेख यांनी त्यांच्या भावाला आरोपीसोबत पाठवले. परंतु, आरोपीने त्याला विद्यापीठ गेटजवळ गाडीतून उतरवले. त्यालाही पाच मिनिटांत येतो, असे सांगून गेलेला तो परत आलाच नसल्याची फिर्याद शेख यांनी दिली.

Back to top button