दौंड : बादशाह शेखचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला | पुढारी

दौंड : बादशाह शेखचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

दौंड; वृत्तसेवा : दौंड शहरातील हाणामारी, अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी दौंंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात शेख यांच्यासह जवळपास 20 जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगा, विनयभंग करणे आदी कलमान्वये दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून बादशाह शेख यांनी अर्ज केला होता.

या घटनेनंतर बादशाह शेख यांना दौंड पोलिसांनी अटक न केल्याने आमदार नितेश राणे यांनी दौंड पोलिस स्टेशनसमोर हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलन केले होते. इंदापूर येथे हिंदू खाटीक समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. याच प्रकरणात दौंड पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली होती. घटना 20 ऑक्टोबरला घडली होती. 9 नोव्हेंबर रोजी बादशाह शेख व इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून आजपर्यंत या गुन्ह्यातील चार आरोपींना दौंड पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींचा दौंड पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button