पुणे : शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला का? | पुढारी

पुणे : शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला का?

पुणे : राज्य शासनाच्या शिक्षण योजना संचालनालयातर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती आदी योजनांची अंमलबजावणी केली जाते. यातील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, अर्जांची ऑनलाइन पडताळणीसाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.

या शिष्यवृत्तीची संपूर्ण माहिती http://www.scholarships.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्याचा धर्मनिहाय कोटा 2 लाख 85 हजार 451 निश्चित केला आहे. पात्र विद्यार्थ्यांना एक हजार ते दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना नववीसाठी 5 हजार व दहावीसाठी 6 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी  गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते, तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ शासकीय किंवा अनुदानित शाळेमध्ये नियमित आणि पूर्णवेळ शिक्षण घेणार्‍या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळतो. निवड होणार्‍या विद्यार्थ्यांना सात ते अकरा हजार रुपये
शिष्यवृत्ती मिळते.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती
उपलब्ध अर्ज – 4 लाख 14 हजार 823
अर्जांची पडताळणी – 51 हजार 259
सदोष अर्ज – 2 हजार 439
नाकारण्यात आलेले अर्ज – 1 हजार 887
संस्थास्तरावर प्रलंबित अर्ज – 85 हजार 106
जिल्हास्तरावर प्रलंबित अर्ज – 2 लाख 54 हजार 459

बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मुलींसाठी
उपलब्ध अर्ज – 81 हजार 154
अर्जांची पडताळणी – 10 हजार 401
सदोष अर्ज – 482
नाकारण्यात आलेले अर्ज – 128
संस्थास्तरावर प्रलंबित अर्ज – 17 हजार 442
जिल्हास्तरावर प्रलंबित अर्ज – 49 हजार 338

राष्ट्रीय आथिर्र्क दुर्बल घटक शिष्यवृत्ती
उपलब्ध अर्ज – 11 हजार 632
अर्जांची पडताळणी – 5 हजार 187
सदोष अर्ज – 21
नाकारण्यात आलेले अर्ज – 40
संस्थास्तरावर प्रलंबित अर्ज – 322
जिल्हास्तरावर प्रलंबित अर्ज – 5 हजार

Back to top button