दूध फॅट खुलाशांवर निर्णय उद्या; कात्रज दूध संघ

दूध फॅट खुलाशांवर निर्णय उद्या; कात्रज दूध संघ

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध संघात म्हशीच्या दुधाचे कमी फॅट असताना ते जादा फॅट दाखविण्याच्या प्रकरणात कारणे दाखवा नोटिसा दिलेल्या नऊ कर्मचार्‍यांकडून प्रशासनास खुलासे प्राप्त झालेले आहेत. त्यावर आता बुधवारी (दि. 23) संचालक मंडळाच्या दुपारी दोन वाजता होणार्‍या बैठकीत चर्चा होऊन कारवाईची अंतिम दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.  याबाबत कात्रजच्या प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार संबंधित नऊ जणांकडून खुलासे प्राप्त झाले असून, याचे सूत्रधार शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन निश्चितपणे ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

काही तालुक्यांतील फॅटही एकसारखेच कसे?
खेडमधील फॅटचे प्रकरण ऐरणीवर आल्यानंतर आता कात्रज दूध संघाला पुरवठा होणार्‍या जिल्ह्यातील आणखी काही तालुक्यांतील गायीच्या दुधाचे फॅटही एकसारखेच येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.कात्रज मुख्यालयात सुमारे 80 लाख रुपयांचे दूधभेसळ तपासणीचे मशिन तातडीने कार्यान्वित झालेआहे.

दारू पार्टीचाही वास आणि कारवाई सपाट
कात्रज दूध संघात सॅम्पल टेस्टिंग विभागात दोन वर्षांपूर्वी दारू पार्टी झाल्याची बाब समोर आली होती. त्यावर प्रशासनाने कारवाई करीत काही कर्मचार्‍यांना दंड करीत त्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यांना त्याच विभागात आणण्यासाठी कोणाचे हित साधले गेले आहे? यावर आता चर्चा पक्षीय पातळीवरही सुरू झाल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news