पुणे : बांगडा, बोंबील झाले स्वस्त; दरात दहा टक्क्यांनी घसरण | पुढारी

पुणे : बांगडा, बोंबील झाले स्वस्त; दरात दहा टक्क्यांनी घसरण

पुणे : गणेश पेठेतील मासळी बाजारात बांगडा व बोंबील मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. मागणीपेक्षा आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने दरात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. थंडीमुळे सर्व प्रकारच्या मासळीला मागणीही चांगली आहे. मागणीपेक्षा आवक अपुरी पडल्याने अन्य मासळींचे भाव दहा टक्क्यांनी वधारले आहेत.

देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक बाजारात होत आहे. यामध्ये, बांगडा व बोंबील मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहे. बाजारात मटण, चिकन व अंडींनाही मागणी चांगली आहे. मागणी इतकाच पुरवठा होत असल्याने चिकन व अंडीचे दर टिकून असल्याचे पोल्ट्री फार्मर्स अ‍ॅण्ड ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी वसंतकुमार यांनी सांगितले.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 20) खोल समुद्रातील मासळीची 12 ते 15 टन, खाडीची 200 ते 300 किलो, तर नदीच्या मासळीची 300 ते 400 किलो आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 18 टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर): पापलेट : कापरी : 1600-1700, मोठे : 1400-1500, मध्यम : 900-1000, लहान : 700-800, भिला : 550-600, हलवा : 550-600, सुरमई : 550-600, रावस : 550-900, घोळ : 850, करली : 320-360, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 360-400, पाला : 1000-1200, वाम : 600-700, ओले बोंबील : 120-180. कोळंबी : लहान 200-320, मोठी : 360-550, जंबोप्रॉन्स : 1200-1400, किंगप्रॉन्स : 750-800, लॉबस्टर : 1800-2000, मोरी : 200-280, मांदेली : 100-140, राणीमासा : 160-200, खेकडे : 250-280, चिंबोर्या : 480-550. खाडीची मासळी : सौंदाळे : 240-280, खापी : 180-200, नगली : 400-480, तांबोशी : 400-480, बांगडा : 100-180, शेवटे : 200-240, पेडवी : 100, बेळुंजी : 120-140, तिसर्या : 240, खुबे : 120-140, तारली : 100-120. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 400-480, शिवडा : 240-280, खवली : 200-240, आम्ळी : 120-160, खेकडे : 320-400, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 700, बोलाईचे 700, खिमा 700, कलेजी 740. चिकन 200, लेगपीस 250, जिवंत कोंबडी 140, बोनलेस 300. अंडी : गावरान (शेकडा) 940, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 567, डझन 78, प्रतिनग 6.50.

Back to top button