पुणे : लग्नसराईमुळे कटफ्लॉवरला मागणी | पुढारी

पुणे : लग्नसराईमुळे कटफ्लॉवरला मागणी

पुणे : लग्नसराईमुळे सजावटीसाठी लागणार्‍या डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा, लिलियम, ऑर्चिड आदी शोभिवंत फुलांना मागणी वाढली आहे. परिणामी, त्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित अन्य सर्व फुलांची आवक जावक टिकून असून दर कायम आहे. गुरूवार (दि. 24) पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अन्य फुलांनाही मागणी वाढेल, अशी माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 10-30, गुलछडी : 20-50, अष्टर : जुडी 8-15, सुट्टा 80-120, कापरी : 20-30, शेवंती : 20-50, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 10-30, गुलछडी काडी : 50-120, डच गुलाब (20 नग) : 80-220, जर्बेरा : 40-60, कार्नेशियन : 150-200, शेवंती काडी 100-200, लिलियम (10 काड्या) 800-1200, ऑर्चिड 400-500.

 

Back to top button