चाकण : कांदा, बटाट्याची आवक घटली; कार्तिकीमुळे रताळ्यांची मोठी आवक | पुढारी

चाकण : कांदा, बटाट्याची आवक घटली; कार्तिकीमुळे रताळ्यांची मोठी आवक

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा व बटाट्याची आवक घटली व भावातही घसरण झाली. गाजराची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले आहेत. कार्तिकी एकादशीमुळे रताळ्याची मोठी आवक झाली. लसणाची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. वाटाणा व जळगाव भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली असून, भाव तेजीत आहेत. फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक वाढून पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली. जनावरांच्या बाजारात शेळ्या- मेंढ्यांची संख्या कमी झाली.

एकूण उलाढाल 2 कोटी 90 लाख रुपये झाली. चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1,750 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक निम्म्याने घटूनही भावात 200 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 2 हजार 200 रुपयांवरून 2,000 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 3,000 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 750 क्विंटलने घटून भावात 100 रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव 2,600 रुपयांवरून 2,500 रुपयांवर स्थिरावला.

जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक 3 क्विंटल झाली असून, या शेंगांना 5 हजार, 700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 233 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही 25 क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला 2 हजार ते 4 हजार रुपये असा भाव मिळाला. शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा – एकूण आवक – 1,750 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,000 रुपये, भाव क्रमांक 2. 1,500 रुपये, भाव क्रमांक 3. 1,200 रुपये.

बटाटा : एकूण आवक – 3,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,500 रुपये, भाव क्रमांक 2. 2,000 रुपये, भाव क्रमांक 3. 1,500 रुपये.
फळभाज्या : आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे – टोमॅटो – 308 क्विंटल (500 ते 1,000 रु.), कोबी – 235 क्विंटल (500 ते 1,000 रु.), फ्लॉवर – 255 क्विंटल (500 ते 1,000 रु.), वांगी – 106 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रु.), भेंडी – 93 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रु.), दोडका – 82 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रु.), कारली – 78 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रु.), दुधीभोपळा – 53 क्विंटल ( 500 ते 1,500 रु.), काकडी – 94 क्विंटल ( 500 ते 1,500 रु.), फरशी – 43 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रु.), वालवड – 64 क्विंटल ( 3,000 ते 5,000 रुपये), गवार – 64 क्विंटल ( 4,000 ते 6,000 रू.), ढोबळी मिरची – 92 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रु.), चवळी – 26 क्विंटल ( 2,500 ते 3,500 रुपये.), वाटाणा – 340 क्विंटल ( 6,000 ते 8,000 ) शेवगा – 6 क्विंटल ( 5,000 ते 10,000 रुपये ), गाजर – 160 क्विंटल ( 1,000 ते 2,000 रु.).

पालेभाज्या : आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -मेथी : एकूण 18 हजार 200 जुड्या (500 ते 1,500 रुपये,), कोथिंबीर – एकूण 19 हजार 600 जुड्या (200 ते 400 रुपये), शेपू – एकूण 3 हजार 900 जुड्या ( 400 ते 600 रुपये ), पालक – एकूण 2 हजार जुड्या ( 400 ते 800 रुपये).

Back to top button