

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यभरातील शिवप्रेमी पेटून उठले आहेत. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसने कोश्यारी यांचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डमी भगतसिंह कोश्यारी उभे करून त्यांचं धोतर फेडले आणि त्यांचा निषेध करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतुळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपाल हटावची मागणीही करण्यातआली.
कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत, त्यांची गडकरी, पवारांशी तुलना केली. यावरून हा वाद पेटला आहे. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी ठिकठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली.