मंचर : खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर | पुढारी

मंचर : खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मंचर येथील संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकूण 19 जागांसाठी 54 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक पी. एस. रोकडे यांनी दिली. संघात सहभागी शेतकी सहकारी संस्थांचे प्रतिनिधी 10 जागा, इतर प्रकारच्या सभासद सहकारी संस्थांचे प्रतिनिधी 2 जागा, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधीसाठी 1 जागा, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रतिनिधी 1 जागा, इतर मागासवर्गीय प्रतिनिधींसाठी 2 जागा, व्यक्तिगत सभासदांचे प्रतिनिधींसाठी 2 जागा यासाठी ही निवडणूक होणार आहे.

नामनिर्देशन पत्राची छाननी सोमवारी (दि. 21) दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत होणार आहे. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी मंगळवार (दि. 22) ते मंगळवार (दि. 6 डिसेंबर) सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंतचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांना निशाणीचे वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन दि. 7 डिसेंबर सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष मतदान दि. 18 डिसेंबर सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि त्यानंतर मतमोजणी लगेचच होणार आहे.

19 जागांसाठी 54 अर्ज दाखल
महिला मतदारसंघासाठी 2 जागांसाठी 5 अर्ज, इतर मागासवर्ग मतदारसंघातील 1 जागेसाठी 5 अर्ज, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या 1 जागेसाठी 4 अर्ज, शेतकी सहकारी संस्थांचे प्रतिनिधींच्या 10 जागांसाठी 17 अर्ज, इतर प्रकारच्या सभासद सहकारी संस्थांचे प्रतिनिधींसाठी असलेल्या 2 जागांकरिता 9 अर्ज, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी 1 जागेसाठी 3 अर्ज, तर व्यक्तिगत सभासदांचे प्रतिनिधींच्या 2 जागांसाठी 11 अर्ज दाखल झाले आहे. नामनिर्देशन पत्राच्या छाननी सोमवार दि. 21 रोजी होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

 

Back to top button