मंचरमधील विकासकामांसाठी 5 कोटी 95 लाख : शिवाजीराव आढळराव पाटील | पुढारी

मंचरमधील विकासकामांसाठी 5 कोटी 95 लाख : शिवाजीराव आढळराव पाटील

मंचर; पुढारी वृत्तसेवा : मंचर नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांना नगरविकास खात्याने मंजुरी दिल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. यासाठी 5 कोटी 95 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी (दि. 18) झालेल्या पत्रकार परिषदेत आढळराव पाटील यांनी ही माहिती दिली.

या वेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, तालुकाप्रमुख अरुण गिरे, पतसंस्थेचे संचालक योगेश बाणखेले, युवानेते स्वप्निल बेंडे, योगेश थोरात, सुरेश घुले, धनेश मोरडे, रामदास बाणखेले, मंचर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज पष्टे आदी उपस्थित होते.

नगरविकास खात्याने मंजुरी दिलेली कामे व निधी पुढीलप्रमाणे : उद्यानाचे सुशोभीकरण करणे एक कोटी रुपये, भाजी मंडई येथे पत्राशेड उभारणे, ओटे बांधणे 70 लाख, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मित्र सागर पेट्रोल पंप पथावर दुतर्फा लादीकरण दहा लाख, देणेवस्ती ते भीमाशंकर सोसायटी रस्ता डांबरीकरण 15 लाख, एस कॉर्नर येथे गणपती मंदिराजवळ शेड बांधणे दहा लाख, मुळेवाडी रोड ते जीवदानी सोसायटी शिवनेरी सोसायटीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण दहा लाख, माजी सरपंच मीराताई बाणखेले यांच्या वस्तीवरील रस्ता डांबरीकरण करणे दहा लाख, भैरवनाथ गल्ली येथील भैरवनाथ मंदिर परिसर सुशोभीकरण 15 लाख, चौंडेश्वरी गल्ली येथे वारकरी निवास खोल्या बांधणे व परिसर सुधारणा वीस लाख, बाळांतपुरी बाबाजवळील पुलापासून फॉरेस्टपर्यंत रस्ता सुधारणा दहा लाख, कुबेरपुरम सोसायटी ते नवीन पुणे-नाशिक हायवे रस्ता सुधारणा दहा लाख, खेडकर हॉस्पिटल ते गोकर्णश्वर रस्ता दहा लाख, मंचर-मोरडेवाडी रास्ता काँक्रिटीकरण 70 लाख, मोरडेवाडी येथील हॉटेल लक्ष्मी ते बागलमळ्यात बंदिस्त गटार योजना 80 लाख, मोरडेवाडी येथील नवी आळी ते विठ्ठल मंदिर बंदिस्त योजना राबविणे चाळीस लाख, भेकेमळा येथील पडाक वस्ती येथे सभामंडप बांधणे वीस लाख, बैलबाजार ते दाधरादेवी मंदिरापर्यंतचा रस्ता सुधारणा तीस लाख, डोबीमळ्याकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण 25 लाख, मंचर बाजारतळ येथे स्वच्छतागृह बांधणे वीस लाख, संभाजी चौकनजीक स्वच्छतागृह वीस लाख.

Back to top button