‘निरा भीमा’चे एका दिवसामध्ये 6000 मे. टन ऊस गाळप | पुढारी

‘निरा भीमा’चे एका दिवसामध्ये 6000 मे. टन ऊस गाळप

बावडा; पुढारी वृत्तसेवा : शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 च्या चालू असलेल्या 22 व्या ऊस गळीत हंगामामध्ये कारखान्याच्या प्रतिदिनी गाळपाच्या इतिहासामध्ये शनिवारी (दि. 19) 6000 मे. टनाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून, कारखान्याने शनिवार दि.19 अखेर 1,34,263 मे. टन उसाचे गाळप केले असून, चालू गळीत हंगामामध्ये 8 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने कारखान्याची नियोजनबद्ध अशी वाटचाल सुरू आहे. सध्या प्रतिदिनी सुमारे 5300 ते 5600 मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे. तसेच कारखान्याचे सहवीज, इथेनॉल आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने चालू आहेत.

कारखान्याने एका दिवसामध्ये उच्चांकी 6000 मे. टन ऊस गाळप करून कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, कार्यकारी संचालक राम पाटील व संचालक मंडळ यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करणारे शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार व मजूर, अधिकारी, कर्मचारी व कारखान्याचे हितचिंतक या सर्वांचे अभिनंदन केले.

Back to top button