पळसदेव : जिद्द असेल तर कोणतेही मैदान तुम्ही मारू शकता : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे | पुढारी

पळसदेव : जिद्द असेल तर कोणतेही मैदान तुम्ही मारू शकता : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

पळसदेव; पुढारी वृत्तसेवा : जिद्द असेल तर कोणतेही मैदान तुम्ही मारू शकता. मैदानात उतरा, मनाने खचू नका, अंगात जोश भरून खेळत राहा, तुमचा विजय नक्की होईल. विद्यालयाने कबड्डी खेळाचे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे केल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. शाळेसाठी कोणतीही मदत लागल्यास तत्काळ सांगा, ती करू, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

एल. जी. बनसुडे विद्यालयातील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पळसदेव (ता. इंदापूर) येथे भरणे यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मैदानात विद्यार्थ्यांसोबत कबड्डी खेळण्यातही त्यांनी बाजी मारून उपस्थितांची मने जिंकली. भरणे यांनी दीप प्रज्वलन करून कबड्डीच्या मॅटचे व नवीन इमारतीचे उद्घाटनकेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शाळेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांनी भरणे यांनी शाळेला केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.

कबड्डी खेळामध्ये 14 व 19 वयोगटातील एकूण 60 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यावेळीे क्रीडा अधिकारी महेश चावले, दत्तात्रय व्यवहारे, प्रदीप काळे, दीपक भोसले, शरद झोळ, इंद्रायणी मोरे, कैलास भोसले, सुनीता बनसुडे, जयश्री शेलार, नंदाताई बनसुडे, डॉ. शीतलकुमार शहा, नितीन बनसुडे, हनुमंत आप्पा मोरे, बाबा बनसुडे, प्राचार्य वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे सर्व शाळांचे क्रीडाशिक्षक आदी उपस्थित होते. त्रसंचालन प्रवीण मदने व आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.

Back to top button