पारगाव : भाविकांचा धोकादायक प्रवास | पुढारी

पारगाव : भाविकांचा धोकादायक प्रवास

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र आळंदीला जाणारे भाविकभक्त धोकादायक प्रवास करताना दिसत आहेत. पिकअप, टेम्पो, ट्रक यांच्या मागील बाजूचे फाळके जमिनीला समांतर करून फाळक्यांवर भाविक बसून पुणे-नाशिक महामार्गावरून आळंदीकडे जाताना दिसत आहेत. रविवारी (दि. 20) आळंदी यात्रा संपन्न होत आहे. त्यानिमित्त जिल्ह्याच्या उत्तर भागातील खेड , जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील भाविक आळंदीला जात आहेत.

संगमनेर,अकोले, सिन्नर,नाशिक या भागातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक आळंदीकडे जात आहेत. वारकरी अक्षरक्षः धोकादायक प्रवास करून देवदर्शनासाठी जात आहेत. शनिवारी (दि. 19 ) पुणे- नाशिक महामार्गावरून शेकडो वाहने आळंदीकडे जात होती. आळंदीला जाताना खेडचा घाट आहे. रस्ते वळणाचे आहेत. तरीही भाविक पाय मोकळे सोडून प्रवास करत होते. महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकांना, भाविकांना थांबवून समज देणे गरजेचे आहे.

Back to top button