दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ : बुद्धिबळाच्या पटावर आज रंगणार ‘ती’चा सामना | पुढारी

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ : बुद्धिबळाच्या पटावर आज रंगणार ‘ती’चा सामना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिलांच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धा रविवार दि. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता फडके हॉल येथे होणार आहेत. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 225 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय गुणांकित खेळाडू स्पर्धेत असणार आहेत.

सोळा वर्षांखालील जागतिक स्पर्धेतील ग्रँडमास्टर आकांक्षा हगवणे हीसुद्धा यात खेळणार आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी मुंबई, कोल्हापूर, परभणी, संभाजीनगर, सातारा, अहमदनगर येथून बुद्धिबळप्रेमी सहभागी होणार आहेत. या सर्व स्पर्धा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या नियमानुसार होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 9 वाजता महिला ग्रँडमास्टर ईशा करवडे यांच्या हस्ते होणार आहे. या सर्व स्पर्धा पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या सहकार्याने होणार आहेत.

Back to top button