Maharashtra Assembly Polls: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवारांचे 38 अर्ज

शेवटच्या दिवशी बागवे, आल्हाट, नडगम यांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शन, कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला
Maharashtra Assembly Polls
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवारांचे 38 अर्जPudhari
Published on
Updated on

Pune News: जोरदार शक्तिप्रदर्शन, मिरवणुका आणि घोषणा देत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या (मंगळवारी) दिवशी काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे, वंचित बहुजन आघाडीचे नीलेश आल्हाट आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे यशवंत नडगम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष यांच्यासह 27 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा (राखीव) मतदारसंघात मंगळवारी (दि. 29) हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता.

रमेश बागवे यांचे शक्तिप्रदर्शन

काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी मंगळवारी महाशक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. रमेश बागवे यांनी सकाळी पुण्यातील भवानीमाता मंदिरात दर्शन घेतले. या वेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. काँग्रेस पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, या अतिशय उत्साही अशा वातावरणात भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला.

Maharashtra Assembly Polls
Maharashtra Assembly Polls: संभाजी ब्रिगेडचे 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

या वेळी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव रवींद्र दळवी, पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी जगदीश ठाकूर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ नेते अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक रफिक शेख, लता राजगुरू, पुणे कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष गौतम महाजन, करण मखवानी, मंजूरभाई शेख, संगीता पवार, विनोद मथुरावाला, शिक्षण मंडळ माजी उपाध्यक्ष नुरुद्दीन अली सोमजी, माजी नगरसेवक अविनाश बागवे, संगीता तिवारी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा थोरात, मृणाल वाणी, भोलासिंग अरोरा, जुबेरबाबू शेख, मागासवर्गीयचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, युवक आघाडीचे गोविंद जाधव सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, जावेदभाई खान, महिला अध्यक्षा पल्लवी जावळे, चंद्रशेखर जावळे, डॉक्टर अमोल देवळेकर आदी प्रमुख नेते सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत महाविकास आघाडी, व मित्रपक्षांचे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महाराष्ट्र स्वराज्यकडून यशवंत नडगम यांचा अर्ज दाखल

दलित पँथर संघटनेच्या माध्यमातून मागील 25 वर्षांत केलेल्या सातत्यपूर्ण जनकल्याणाच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने यशवंत नडगम यांनी कार्यकर्त्याच्या गर्दीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

Maharashtra Assembly Polls
Maharashtra Assembly Polls: बारामतीच्या राजकारणात अभिजित बिचुकलेंची एन्ट्री; पवारांविरोधात उतरले मैदानात

लता राजगुरू यांचा अपक्ष अर्ज

काँग्रेसच्या माजी नगरसेविका लता राजगुरू यांनी मंगळवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वास्तविक, या वेळी त्यांनी उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेस पक्षाकडे खूप प्रयत्न केले होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

वंचितचे उमेदवार नीलेश आल्हाट यांचा अर्ज दाखल

वंचित बहुजन आघाडीकडून शक्तिप्रदर्शन करत उमेदवार नीलेश आल्हाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी आल्हाट हे रिपाइं पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या वेळी पुणे शहराध्यक्ष अ‍ॅड. अरविंद तायडे, ज्येष्ठ नेते वसंत साळवे, सोनू निकाळजे, अ‍ॅड. गजानन चौधरी, नागेश भोसले, मिलिंद बनसोडे, प्रशांत वाघमारे, मा. पंचशील चौरे, गोविंद साठे, प्रशांत म्हस्के, अझर शेख, अन्वर शाह, समाधान शेंडगे, नितीन वाघमारे, महानंदा डाळिंबे, मंगल कांबळे, अविनाश मोरे, प्राण आव्हाड, विनायक चव्हाण, चंदा सोनवणे, अक्षय धेंडे, लखन साबळे तसेच तीन ते चार हजार तरुणवर्ग, महिला भगिनी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news