अतिक्रमणे हटविण्यास अखेर मुहूर्त; सिंहगडावर वनविभाग आजपासून करणार कारवाई

अतिक्रमणे हटविण्यास अखेर मुहूर्त; सिंहगडावर वनविभाग आजपासून करणार कारवाई
Published on
Updated on

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्यावरील अतिक्रमणे हटविण्यास अखेर वनखात्याला मुहूर्त मिळाला असून, (दि.18) ही कारवाई करण्यात येणार आहे. गडाच्या पायथ्यापासून वाहनतळ तसेच गडावरील हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल, टपर्‍या हटवून सर्व विक्रेत्यांचे एका जागी पुनर्वसन करण्यात येणार आहे.

अलिकडे बेसुमार टपर्‍या आणि स्टॉलमुळे सिंहगडाचे विद्रुपीकरण वाढले आहे.गडाचे ऐतिहासिक महत्त्व , शिवकालीन वारसा अबाधित ठेवण्यासाठी विक्रेते व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वनविभागाने केले आहे. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले,गडाच्या पठारावर 'फूड मॉल' प्रमाणे एकाच रांगेत सर्व विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

गडाच्या पायी मार्गापासून घाट रस्ता, वाहनतळ तसेच गडावरील विक्रेत्यांचे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या विश्रामगृहाजवळ,'ओपन थिएटर' लगतच्या जागेत पुनर्वसन करण्यात येणार आहे.त्यासाठी संबंधित विक्रेते, वनसंरक्षण समिती, सरपंचांच्या उपस्थितीत मंगळवारी सिंहगडावर बैठक घेण्यात आली.दोन दिवसांत सर्व अतिक्रमणे हटविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

सिंहगडावर गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणे वाढली आहेत. ती रोखण्यासाठी वन विभागाने वर्षभरापूर्वी हॉटेलचालकांना नोटिसा दिल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग संपल्याने चालकांनी स्वतः अतिक्रमणे हटवावीत अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. मंगळवारी गडावर झालेल्या बैठकीत मात्र वनविभागाने अतिक्रमणे हटविण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

अतिक्रमणांच्या विळख्यात सिंहगड पायी मार्ग,घाट रस्त्यापासून , गडावरील वाहनतळ तसेच सिंहगडाचा परिसर अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. दहा वर्षांपूर्वी खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे मोजकेच स्टॉल होते. आता अतिक्रमणे वाढल्याने वाहनतळ,घाट रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.अतिक्रमणे काढल्यानंतर वाहनतळ प्रशस्त होणार आहे. तसेच घाट रस्त्यावरील वाहतूक सुरळित होण्यास मदत होणार आहे.

पुणे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप संकपाळ यांनी अतिक्रमणमुक्त व स्वच्छ सिंहगड मोहिम हाती घेतली आहे. मांसाहार,दारू, सिगारेट बंदीप्रमाणेच प्लास्टिक बंदीचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी वनखात्याने अँक्शन प्लॅन तयार केला आहे. विक्रेत्यांना स्टॉल काढण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. 71 स्टॉलधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news