दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप : आजपासून महिला कबड्डीचा थरार | पुढारी

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप : आजपासून महिला कबड्डीचा थरार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिलांच्या कबड्डी क्रीडा स्पर्धेला पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ही स्पर्धा सब -ज्युनियर सोळा वर्षांखालील आणि खुल्या गटामध्ये होणार आहे. दै. ‘पुढारी’ च्या वतीने या स्पर्धा स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमच्या कबड्डी मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत.

शुक्रवार, दि. 18 ते रविवार दि. 20 नोव्हेंबर या दरम्यान रोज सायंकाळी 6.30 पासून महिला कबड्डीपटूंचा थरार पुणेकरांना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये सब ज्युनियर सोळा वर्षांखालील आणि खुल्या गटामध्ये या स्पर्धा होत असून, दोन्ही गटांमध्ये 24-24 महिला संघांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. खुल्या गटामध्ये राजमाता जिजाऊ, एमएच स्पोर्ट्स क्लब, राजा शिवछत्रपती, प्रकाश तात्या बालवडकर या संघांमध्ये चुरस पाहावयास मिळणार आहे.

पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सोळा संघांनी भाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू सायली केरपाळे, राष्ट्रीय खेळाडू अंकिता जगताप, ज्युनियर राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार असून, त्यांचा खेळ पाहण्याची कबड्डी रसिकांना संधी मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील विजेता क्रीडा विकास प्रकल्प प्रबळ दावेदार समजला जात आहे.

Back to top button