दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली

पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील
पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील

दौड/यवत; पुढारी वृत्तसेवा : दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दौंड शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या महिला आणि तरुणांवर प्राणघातक हल्ला प्रकरणाची आणि त्यातील संशयित आरोपींना अटक न करण्यामागील पोलिसांच्या भूमिकेची सीआयडीमार्फत (CID) चौकशी करण्याची जोरदार मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी करीत दौंड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत केली होती.

या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वरील बदली केली आहे, तर दौंड पोलीस स्टेशनचा तात्पुरता कार्यभार पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना देण्यात आला आहे. पाटील यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि यवतमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. कडक आणि शिस्तप्रिय आधिकारी तसेच कर्मचारी वर्गात त्यांचा कायम दबदबा राहिला आहे. दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा भाऊसाहेब पाटील यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये हजर होत कामकाजची सूत्रे हातात घेतली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news