बालकामगारांची संख्या वाढतेय; कोंढवा, वानवडी, उंड्री परिसरातील चित्र | पुढारी

बालकामगारांची संख्या वाढतेय; कोंढवा, वानवडी, उंड्री परिसरातील चित्र

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा : खेळण्या, बागडण्याबरोबरच शिक्षण घेण्याच्या वयात परिसरातील रस्त्यांवर विविध वस्तू विकण्याचे काम सध्या लहान मुले करताना दिसून येत आहे. बाल दिन नुकताच साजरा झाला. मात्र, मुलांच्या हक्कांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, बाल कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

परिसरातील विविध रस्त्यांसह काही दुकाने, हॉटेल व कारखान्यांत लहान मुले काम करताना दिसनू येत आहे. कोंढवा, वानवडी, कोंढवा बुद्रुक, उंड्री, पिसोळी परिसरात बालकामगारांची संख्या लक्षनीय आहे. हातामध्ये प्लास्टिक पिशव्या, किचैन व विविध वस्तू विकण्यासाठी बालकामगारांचा उपयोग करुन घेतला जात आहे. बालकामगार ज्या ठिकाणी फिरत असतात त्यावेळी त्याच्यावर कुणीतरी लक्ष्य ठेवून असल्याचेही निर्दर्शनास येत आहे. जास्त वेळ ही मुले एका जागेवर थांबत नाहीत.

कटाळलेली मुले एखाद्या ठिकाणी सावलीला बसली, तर ते काही क्षणात उठतात. एक प्रकारची भिती त्यांच्यात दिसून येते. महागाईमुळे गरीबीचा आलेख उंचावत आहे. अनेकांना रोजगार नाही हे जरी खरे असले तरी, लहान मुलांना कामाला लावणे योग्य नाही. शिक्षणापासून वंचित राहणार्‍या या मुलांना भवितव्याकडे कुणाचे लक्ष असल्याचे दिसूत नाही. यामुळे प्रशासनाने लक्ष दिल्यास या मुलांचे आयुष्य बदलू शकते. यामुळे याबाबत योग्या उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

 

Back to top button