महाळुंगे इंगळे; पुढारी वृत्तसेवा : निघोजे ( ता. खेड ) येथील उद्योजक संतोष सोपान शिंदे ( वय ४७ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुना हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, चार बहिणी, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शिलाताई शिंदे यांचे ते चिरंजीव, तर आदर्श महानगाव निघोजच्या माजी सरपंच कांचनताई शिंदे यांचे ते पती होते.