शनिवारवाड्याच्या आवारातील दर्गा हटवा; हिंदू महासंघाची मागणी | पुढारी

शनिवारवाड्याच्या आवारातील दर्गा हटवा; हिंदू महासंघाची मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शनिवारवाड्याच्या आवारातील दर्ग्याची नोंद पुणे महापालिका आणि पुरातत्व विभागाकडे आहे का? याचा खुलासा करावा, दर्ग्याची नोंद नसल्यास अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची कारवाई त्वरित करण्यात यावी, अशी मागणी हिंदू महासंघातर्फे करण्यात आली आहे. प्रतापगडावर जिवा महालेंचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणीही महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.

हिंदू महासंघाने शनिवारवाड्याच्या आवारातील दर्ग्याबाबत पुरातत्व खाते आणि पुणे महापालिकेच्या हेरिटेज प्रॉपर्टी विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मपुणे शहराचा अभिमान असलेला आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी तयार केलेल्या शनिवारवाड्याच्या आवारात मुख्य प्रवेशद्वाराजवळ वडाच्या झाडाखाली हजरत सय्यद अशा काहीतरी नावाचा दर्गा निदर्शनास येतो आहे. पेशवे काळात अशा प्रकारचा कुठलाही दर्गा बांधला असल्याची नोंद बघण्यात येत नाही. पुरातत्व विभागाकडे नोंद नसल्यास दर्ग्यावर अतिक्रमण कारवाई करावीफ, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रतापगडावर जिवा महालेंचे स्मारक उभारण्यात यावे
महोता जिवा म्हणून वाचला शिवाफ असे म्हटले जाते. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या अफझलखान वधावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचविताना जिवा महालेंनी प्राणांची आहुती दिली. अशा योद्ध्याचे स्मारक प्रतापगड येथे उभारण्यात यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात येत आहे, अशी माहिती दवे यांनी दिली.

Back to top button