

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सासूच्या विनयभंगप्रकरणी जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 13) रात्री ताम्हाणेवस्ती, चिखली येथे घडली. याप्रकरणी 47 वर्षीय सासूने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीस वर्षीय जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची नात घरी असताना आरोपी जावई घरी आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.
हा प्रकार सुरू असताना फिर्यादी यांचा मुलगा घरी आला असता आरोपीने मुलालादेखील मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.