पुणे : ‘लम्पी’ त्वचारोगाचे प्रमाण उपाययोजनांमुळे घटले

पुणे : ‘लम्पी’ त्वचारोगाचे प्रमाण उपाययोजनांमुळे घटले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पशुधनाचे मोठ्या प्रमाणात मोफत लसीकरण करून विविध उपाययोजना अमलात आणण्यामुळे राज्यात लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव घटल्याचा दावा पशुसंवर्धन आयुक्तालयाने केला आहे. आत्तापर्यंत पशुपालकांच्या बँक खात्यावर 13 कोटी 67 लाख रुपयांची नुकसानभरपाई जमा करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

'लम्पी' त्वचारोग हद्दपार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुधनाच्या मोफत लसीकरणासह पशुपालकांना केलेले मार्गदर्शन, खासगी डॉक्टरांची उपचारांसाठी घेतलेली मदत, दुर्गम भागात लसीकरण अधिक सुलभतेने होण्यासाठी अ‍ॅनिमल अ‍ॅम्ब्युलन्सचा वापर, संवेदनशीलपणे तातडीने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे या रोगाचा आलेख घटल्याचे म्हटले आहे.

राज्यामध्ये 34 जिल्ह्यांमधील एकूण 3 हजार 543 संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून आला असून, बाधित गावांतील एकूण 2 लाख 42 हजार 751 बाधित पशुधनापैकी एकूण 1 लाख 71 हजार 564 पशुधन उपचाराने बरे झाले आहेत. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. बाधित पशुधनापैकी 16 हजार 150 पशुधनाचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news