बारामती : शेतकर्‍यांनी कृषी उन्नती योजनेचा लाभ घ्यावा

बारामती : शेतकर्‍यांनी कृषी उन्नती योजनेचा लाभ घ्यावा

बारामती : कृषी उन्नती योजना 2022-23 अंतर्गत ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार असून, कृषी विभाग व महाबीजमार्फत शेतकर्‍यांना कडधान्य, गळीत धान्य व तृण धान्याचे प्रमाणित बियाणे अनुदानाच्या दराने पुरवठा करण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे केले आहे.

या ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमात शेतकर्‍यांना बियाणे परमीटवर वाटप करण्यात येणार आहे. एक एकर मर्यादित कडधान्य व गळीत धान्य बियाण्यासाठी 60 टक्के व तृणधान्य बियाण्यासाठी 50 टक्के अनुदान देय असणार आहे. बारामती, दौंड, इंदापूर व पुरंदर तालुक्यात हरभरा बियाण्याच्या 10 वर्षांच्या आतील वाणास प्रत्येकी 35 क्विंटल, 10 वर्षांवरील वाणास प्रत्येकी 55 क्विंटल, गहू बियाण्याच्या 10 वर्षांच्या आतील वाणास बारामती व इंदापूर तालुक्यासाठी प्रत्येकी 13 क्विंटल, दौंड व पुरंदरसाठी प्रत्येकी 14 क्विंटल व 10 वर्षांवरील वाणास बारामतीसाठी 86, दौंडसाठी 95, इंदापूर व पुरंदरसाठी प्रत्येकी 80 क्विंटल बियाणे वाटपाचे लक्षांक आहे.

हरभरा व गहू पिकांच्या बियाण्याच्या प्रतिएकर अनुदानित दराची माहिती कृषी विभाग व महाबीज कंपनीची एजन्सी यांच्याकडे उपलब्ध आहे. शेतकर्‍यांनी सात-बारा उतारा व आधारकार्ड घेऊन संबंधित गावचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news