पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात 6 जण गंभीर जखमी | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात 6 जण गंभीर जखमी

पळसदेव; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावर सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास डाळज नं. 3 (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत रुग्णवाहिकेला (एमएच 24 एयू 7259) पाठीमागून येणार्‍या लक्झरी बसने (एआर 11 ए 9009) जोरदार धडक दिली. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून, चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रुग्णवाहिकेतील चालक आनंद महादेव कांबळे हे लातूरचे रहिवासी असून, ते मुंबईला निघाले होते.

अपघातात रुग्णवाहिकेतील चालक आनंद महादेव कांबळे (वय 21, रा. पाटील चौक, नांदगाव वेस, लातूर) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर सूर्यकांत नागाप्पा नावतगे (वय 60), गुंडूबाई सूर्यकांत नावतगे (वय 56), वैशाली सूर्यकांत नावतगे (वय 20) मल्लिकार्जुन श्रीकांत नावतगे (वय 12), पवन बाबूराव राजळकर (वय 26) हे जखमी झाले आहेत. जखमींना भिगवण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसचालक वाहन जागीच सोडून पळून गेला.

 

Back to top button