पिंपरखेड : बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या, कुत्रा गंभीर | पुढारी

पिंपरखेड : बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या, कुत्रा गंभीर

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा : काठापूर ( ता. शिरूर ) येथे मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये दोन मेंढ्या, एक कुत्रा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 13) रात्री घडली. बिबट्याच्या हल्ल्याने शेतकरी व मेंढपाळ भयभीत झाले असून, या परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

काठापूर येथे शेतकरी बाळासाहेब थेटे यांच्या शेतामध्ये बापू ठोंबरे या मेंढपाळाचा मेंढ्यांचा कळप रात्री वास्तव्यास होता. मध्यरात्री बिबट्याने वाड्यावर हल्ला करीत धुमाकूळ घातला. बिबट्याने दोन मेंढ्या, एक कुत्रा यांच्यावर हल्ला केला. इतर मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यावर ठोंबरे यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने पलायन केले.

थेटे यांनी माहिती दिल्यावर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर व वास्तव्य असून, वन विभागाने या ठिकाणी तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी थेटे यांनी
केली आहे.

Back to top button