पुणे : ‘एक्सप्रेस वे’वर 24 तास गस्त; नियमभंग केल्यास ‘आरटीओ’कडून दंडांची कारवाई | पुढारी

पुणे : ‘एक्सप्रेस वे’वर 24 तास गस्त; नियमभंग केल्यास ‘आरटीओ’कडून दंडांची कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आता आरटीओकडून 24 तास गस्त घालण्यात येणार आहे. या वेळी वाहनचालक नियमभंग करताना आढळल्यास आरटीओकडून मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. येत्या 1 डिसेंबरपासून ही मोहीम आरटीओ प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

महामार्गावरील वाढते अपघात रोखण्याकरिता नवनियुक्त परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी हे आदेश दिले आहेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. नुकतीच भोसरी येथील सीआयआरटी येथे राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकार्‍यांची परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या वेळी महामार्ग पोलिस अधिकारी लता फड उपस्थित होत्या. त्यांनी महामार्गावरील अपघात आणि वाहनचालकांकडून होत असलेल्या नियमभंगांची माहिती बैठकीत दिली. त्यामुळे परिवहन आयुक्तांनी महामार्गावर आरटीओची 24 तास पथके तैनात करण्याचे आदेश दिले.

 

Back to top button