वेळेला महत्त्व अन् कार्यातही तत्पर; कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय | पुढारी

वेळेला महत्त्व अन् कार्यातही तत्पर; कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय

सुरेश मोरे

कोंढवा : मुख्य अधिकारी कार्यकुशल आणि तत्पर असेल, तर त्यांच्या बरोबरीने काम करणारे कर्मचारी देखील तसेच असतात. याचे उत्तम उदाहरण कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात दिसून आले. हजेरी लावणे आणि कामकाजात लक्ष देणारे कर्मचारी या ठिकाणी पाहायला मिळाले. या कार्यालयाची हद्द सर्वांत मोठी आहे. प्रभाग क्रमांक 41 व 38, 42 मधील काही भाग तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या वडाचीवाडी, पिसोळी, गुजर निंबाळकरवाडी यांचा या कार्यालयात समावेश आहे. या कार्यालयाचे क्षेत्रफळ खूप मोठे आहे.

गुरुवारी (दि. 10) सकाळी दहा वाजता आस्थापन, टेंडर विभागात कर्मचारी आपल्या जागेवर बसून फाईल तपासण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर अतिक्रमण विभाग आणि आकाशचिन्ह विभागातील कर्मचारी व अधिकारी 10 वाजून 10 मिनिटांनी परिसरात कामासाठी बाहेर पडले. आरोग्य विभाग, कोविड वॉररूम या ठिकाणी देखील कर्मचार्‍यांचे कामकाज सुरळीत असल्याचे दिसून आले.

मात्र, अभियंता विभागात शुकशुकाट पाहायला मिळाला. सहायक आयुक्तांच्या कक्षाबाहेर दोन महिला कर्मचारी काम करीत होत्या. ममॅडम आल्यात का?फ असे विचारले असता मयेतील एवढ्यात,फ असे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर 10:35 मिनिटांनी थोडीशी गडबड पाहायला मिळाली. शिपाई पळतच वर आला आणि मॅडम आल्याचे समजले. सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे आल्या आणि कक्षात निघून गेल्या.

..म्हणून कार्यालयाला शिस्त
कार्यालयातील कर्मचार्‍यांची उपस्थिती व कामांमधील तत्पर पाहता जुजबी चौकशी केली. क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे यांनी शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. त्यामुळे या कार्यालयात शिस्त व वेळेला महत्त्व असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले.

Back to top button