कार्ला : अल्पवयीन मुलीचा ग्रामीण पोलिसांंनी तीन तासांत घेतला शोध | पुढारी

कार्ला : अल्पवयीन मुलीचा ग्रामीण पोलिसांंनी तीन तासांत घेतला शोध

कार्ला : वरसोली गावात राहणारी एक अल्पवयीन मुलगी घरात झालेल्या किरकोळ वादानंतर घर सोडून निघून गेली होती. या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन अवघ्या तीन तासांमध्ये नातेवाइकांच्या ताब्यात देण्यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
वरसोली गावातील एक 13 वर्षीय मुलगी घरामध्ये झालेल्या किरकोळ वादावरून ती घरातून निघून गेली होती.

तिच्या नातेवाइकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती मिळून न आल्याने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये याबाबत सर्व हकीगत सांगितली. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश माने यांनी वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देऊन कुठलाही धागादोरा नसताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली व उपलब्ध इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आधारे तिचा शोध घेऊन अवघ्या तीन तासांमध्ये तीला सुखरूप आई वडिलांच्या ताब्यात देण्यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिस अधीक्षक गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, लोणावळा उप विभागाचे अधिकारी सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांंच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश माने यांनी केली.

Back to top button