पिंपरी : लहान मुले मधुमेहाच्या विळख्यात; शहरात 7 ते 8 हजार बालरुग्ण | पुढारी

पिंपरी : लहान मुले मधुमेहाच्या विळख्यात; शहरात 7 ते 8 हजार बालरुग्ण

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मधुमेह हा केवळ जास्त वयाच्या नागरिकांना होतो, असा आपला समज असतो. परंतु, देशातील लहान मुले या विकाराला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात टाईप 1 या मधुमेहाचे 7 ते 8 हजार बालरुग्ण आहेत.
व्यायामाचा अभाव टाईप 1 मधुमेह हा कमी वयात आढळतो. लहान वयात बैठी जीवनशैली, ताणतणाव, मोबाइलमुळे एका जागी बसून राहणे, मैदानी खेळ कमी, शाळा व क्लासेसमुळे व्यस्त जीवनशैली यामुळे कमी वयात मधुमेह होऊ लागला आहे.

सध्याचे पालकदेखील मुलांना पौष्टीक आहार देण्याकडे दुर्लक्ष करतात. शाळेतील डब्यामध्ये ब्रेड जॅम, मॅगी, सँडविच, ब्रेड बटर देत असल्यामुळे मुलांना पौष्टीक आहार द्यावा म्हणून शिक्षक आग्रही आहेत. डब्यामध्ये पोळी भाजी ऐवजी दुसरा पदार्थ दिसल्यास दंड आकाराला जातो. पण डब्याव्यतिरिक्त पालक मुलांना ऐपतीनुसार पिझ्झा, बर्गर, वडापाव, नूडल्स, वडापाव असे पदार्थ हट्टापायी खायला देतात.

जंकफूडपासून मुलांना लांब ठेवा
पूर्वी ब्रेड हा पदार्थ मुलांच्या क्वचितच खाण्यात यायचा. आता मात्र, जंकफूडमुळे मोठ्या प्रमाणात मैदा आणि पिष्टमय पदार्थाचे सेवन केल्यामुळे मुलांमध्ये लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढले आहे.

काय खबरदार घ्यावी?
मुलांच्या वजनावर नियंत्रण ठेवावे, वारंवार वजन तपासून बघावे. व्यायाम होईल अशा खेळात सहभागी करावे. मुलाला भाज्या आणि फळे खाण्यास प्रोत्साहन द्यावे.

पौष्टीक खाण्याकडे दुर्लक्ष
शहराच्या लोकसंख्येतील 7 टक्के रुग्ण हे मधुमेहाचे आहेत. म्हणजेच शहराच्या 22 लाख लोकसंख्येतील पावणेदोन लाख रुग्णांना मधुमेह आहे. त्यातील 5.5 टक्के म्हजेच 7 ते 8 हजार मुलांना मधुमेह आहे. सध्या लहान मुले या विकाराला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. खाण्याच्या वाईट सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे भारतात 0 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याची माहिती पुढे येत आहे.

कोरोना महामारीमुळे जगावर जे संकट आले होते. त्यातून या समस्या उद्भवल्या आहेत. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात कोरोनामुळे विद्यार्थ्यांची गळती झाली आहे, हे स्पष्ट झाले आहे. कारण बरेच पालक स्थलांतरीत झाले आहेत. तरी काहींनी कोरोनात पालक गमावले आहेत. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी काम करावे लागत आहे.

                                                      – संगीता निंबाळकर, समुपदेशक

लहान मुलांमधील मधुमेहाची लक्षणे
जास्त प्रमाणात पाणी पिणे
वारंवार लघवीला जाणे
वारंवार भूक लागणे
स्वभाव चिडखोर होणे
पोटात मळमळ होणे
उलटी होणे
दम लागणे
अभ्यासात लक्ष न लागणे

Back to top button