पुणे : शरद पवारांनी कुठली सहकारी संस्था सुरू केली? राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा सवाल | पुढारी

पुणे : शरद पवारांनी कुठली सहकारी संस्था सुरू केली? राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा सवाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेले दोन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. मला विकास कुठे दिसला नाही. मात्र, नागरिकांमध्ये भय दिसले. शरद पवारांबद्दल आदरच आहे; पण त्यांनी कुठली सहकारी संस्था सुरू केली? असा सवाल केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केला. बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर पुण्यात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत पटेल बोलत होते. ते म्हणाले, बारामतीच्या विकासाचा अनुशेष भरून काढू.

मला मिळालेली माहिती आणि माझ्या वाचनानुसार पवारांनी एकही सहकारी संस्था नव्याने सुरू केली नाही. पवार यांच्याबद्दल आदरच आहे. मात्र, या गोष्टी जनतेसमोर येणे आवश्यक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये भाजपचा खासदार निवडून येईल. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विक्री करण्यात येते, असा दावाही पटेल यांनी यावेळी केला.

कर्‍हा नदीत जलप्रदूषण
कर्‍हा नदीत प्रचंड जलप्रदूषण झाले आहे. या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आणि भूमिगत गटारे स्थानिक प्रशासनाने प्रस्तावित केल्यास त्यासाठी माझ्या मंत्रालयाकडून निधी दिला जाईल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.

Back to top button