पिंपरी : प्लायवूडचे दुकान फोडणार्‍यास अटक | पुढारी

पिंपरी : प्लायवूडचे दुकान फोडणार्‍यास अटक

पिंपरी : प्लायवूडचे दुकान फोडून फेवीकॉलचे ड्रम, प्लायवूड चोरणार्‍या आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कलीमुल्लाह उर्फ सद्दाम हाफीझुल्ला खान (29, रा. कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणेनगर येथील डिझायन प्लाय या दुकानात चोरी झाली होती.

दरम्यान, जून महिन्यात याच दुकानातून 15 फेवीकॉलचे ड्रम चोरीला गेले होते. सतत होणार्‍या चोर्‍यांमुळे वाकड पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघत असताना पोलिसांना एका चोरट्याची माहिती मिळाली. त्यानुसार, आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ही चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यातील प्लायवूड, कटर मशीन व फेवीकॉलचे ड्रम असा एकूण 2 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Back to top button