पाटस परिसरात दुष्काळाच्या लवकर झळा; ओढ्याची पाणीपातळी होतेय कमी | पुढारी

पाटस परिसरात दुष्काळाच्या लवकर झळा; ओढ्याची पाणीपातळी होतेय कमी

पाटस; पुढारी वृत्तसेवा : पाटस (ता. दौंड) येथे कुसेगाववरून येणार्‍या ओढ्याची पाणीपातळी कमी होत असल्याने या ओढा परिसरात यंदा लवकर दुष्काळाच्या झळा जाणवणार असल्याने शेतकरी वन्यजीवांना पाण्याची टंचाई जाणवणार असल्याचे शेतकर्‍यांकडून बोलले जात आहे.

यंदा मुसळधार पाऊस होऊन ओढ्यावरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले गेले होते, मात्र पावसाळा संपला की काही दिवसांत या बंधार्‍यामधील पाणीपातळी झपाट्याने कमी होऊ लागल्याचे शेतकर्‍यांच्या लक्षात आले असल्याने यंदा उन्हाळ्यात मोठी पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे.

पाटसला येणारा ओढा हा कुसेगावमधील विजयवाडी तलावातून निर्माण तामखडा, पाटस, वाबळेवस्ती येथून पुढे जात असल्याने कुसेगाव परिसरात या ओढ्यावर जास्त बंधारे असून, मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक केली जाते, मात्र सद्यस्थितीला या बंधार्‍यातील पाणीपातळी कमी होत आहे. उन्हाळ्याच्या आगोदरच या परिसरात दुष्काळाच्या झळा जाणवणार असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button